News By : Santoshkumar Bhalekar (Mobile: 7875757575), Public Relations Officer, 'Vishwas' Factory. Reporter Daily Punyanagari
Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, राजनीती, युद्धनीती व सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन जाण्याच्या पद्धतीचा भारतासह ब्रिटनच्या ग्रंथालयात पुस्तकरूपाने समावेश आहे. असा आपला राजा महान होता. ज्याचा अभिमान स्वकीय व परकियांनाही आहे, अशा शब्दात शाहीर पृथ्वीराज माळी यांनी पोवाडा सादर करताना व्यक्त केले.
येथील प्रचिती सांस्कृतिक मंचाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने आयोजित “शाहीरी डफ कडाडणार” हा पोवाडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन व शाहीर श्री. माळी यांचा सत्कार विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक व यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
शाहीर माळी म्हणाले की, शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला. बालवयातच त्यांनी संघटनकौशल्य, युद्धनीती, राजनीती, समाजभान, वागणूक, व शौर्याचे बाळकडू घेतले. त्यामुळे ते रयतेचे राजा व सर्वांचे स्वाभिमान झाले. साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे कार्य अजरामर असून मानवजातीसाठी प्रेरणास्थान आहे.
शाहीर माळी यांनी खड्या सुरात पोवाड्यातून शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अफजल खान वधापर्यंतचा इतिहास सादर केला. “शिवबाने बांधल तोरण तोरण्याला” हे स्वलिखित गीत व “दशक्रिया” चित्रपटाचे प्रारंभ गीत त्यांनी बहारदार सादर केले. त्यांना शाहीर कल्पनाताई माळी, कोमल मोळी, बाल शाहीर शौर्यराज माळी, रवींद्र माळी, राजेंद्र घोलप, प्रशीक, सुरज, आर्यन कांबळे, ओंकार दाणे, प्रतीक जाधव, व नीलेश मोहिते यांनी साथ दिली.
कार्यक्रमाची सुरुवात अंबामाता मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. इतर सहकाऱ्यांचा सत्कार प्रचिती मंचाचे अध्यक्ष डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, एस. एम. पाटील, संतोषकुमार भालेकर, अजय जाधव, साधना पाटील व कल्पना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विजय थोरबोले यांनी सूत्रसंचालन केले. मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान, प्रचिती मंच व विराज नाईक युवा मंचच्या सदस्यांनी संयोजन केले.
English
Chhatrapati Shivaji Maharaj’s guerrilla warfare, politics, military strategies, and his inclusive leadership have been recognized not only in India but also in Britain’s libraries. Such a great king commands respect from both his own people and outsiders, as expressed by Shaheer Prithviraj Mali during his powada performance.
The event, “Shahiri Duff Kadadnar,” organized by Pracheeti Cultural Forum on the occasion of Shiv Jayanti, concluded with immense enthusiasm. The inauguration and felicitation of Shaheer Mali were conducted by Viraj Naik, President of Viraj Industrial Group, and Satyajit Naik, President of Yashwant Youth Organization.
Shaheer Mali highlighted that Shivaji Maharaj, born to Shahaji Raje Bhosale and Rajmata Jijau, was imbibed with organizational skills, war strategies, political acumen, social awareness, and bravery from an early age, making him the people’s king and a symbol of pride. Even after 350 years, his work remains immortal and continues to inspire humanity.
Performing with a robust voice and engaging style, Shaheer Mali narrated the history from Shivaji Maharaj’s birth to the slaying of Afzal Khan through powada. He also sang his self-composed “Shiv Shaurya Geet” and the opening song of the Marathi film “Dashakriya” in an enchanting manner. He was accompanied by singers and instrumentalists Kalpanatai Mali, Komal Moli, young Shaheer Shauryaraj Mali, Ravindra Mali, Rajendra Gholap, Prashik, Suraj, Aryan Kamble, Omkar Dane, Pratik Jadhav, and Nilesh Mohite.
The program began with the worship of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue near Ambamata Temple, followed by the grand entry of Shaheer Mali and his team. Dignitaries like D.N. Mirajkar, R.B. Shinde, S.M. Patil, Santoshkumar Bhalekar, Ajay Jadhav, Sadhana Patil, and Kalpana Gaikwad honored other contributors. The event witnessed significant female participation and was anchored by Vijay Thorbole. The organization was managed by Manasinghbha Lok Kalyan Abhiyan, Pracheeti Forum, and Viraj Naik Youth Forum members.