Girjewade Minor Irrigation Project and Jyotirling Temple Area Development Achievements Under My Leadership: Manasingrao Naik – गिरजवडे लघु सिंचन प्रकल्प व ज्योर्तिलिंग मंदिर परिसर विकासाची महत्त्वपूर्ण कामे माझ्या हातून मार्गी : मानसिंगराव नाईक

Girjewade Minor Irrigation Project and Jyotirling Temple Area Development Achievements Under My Leadership: Manasingrao Naik – गिरजवडे लघु सिंचन प्रकल्प व ज्योर्तिलिंग मंदिर परिसर विकासाची महत्त्वपूर्ण कामे माझ्या हातून मार्गी : मानसिंगराव नाईक
Disclaimer

News By : Santoshkumar Bhalekar (Mobile: 7875757575), Public Relations Officer, 'Vishwas' Factory. Reporter Daily Punyanagari

गिरजवडे (ता. शिराळा) : येथे ज्योर्तिलिंग मंदिरातील पांडव शाळेतील जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांचा सत्कार करताना देवस्थान समितीचे सदस्य व इतर पदाधिकारी.
गिरजवडे (ता. शिराळा) : येथे ज्योर्तिलिंग मंदिरातील पांडव शाळेतील जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमात मानसिंगराव नाईक यांचा सत्कार करताना देवस्थान समितीचे सदस्य व इतर पदाधिकारी.

Marathi

तालुक्याच्या उत्तर विभागातील ३२ कोटींचा गिरजवडे लघु सिंचन प्रकल्प व ज्योर्तिलिंग मंदिर परिसर विकासासाठी ३ कोटी रुपये देण्याचे महत्वपूर्ण कामे माझ्या हातून झाले, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

गिरजवडे (ता. शिराळा) : येथे ज्योर्तिलिंग मंदिरातील पांडव शाळेतील जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी भेट दिली. प्रतिष्ठापना झालेल्या मूर्तींची पाहणी करून दर्शन घेतले.

यावेळी मंदिर संस्थान व ग्रामस्थांमार्फत अध्यक्ष मानसिंगभाऊ यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. म्हणाले प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून श्री क्षेत्र जोतिर्लिंग मंदिरासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यातून पीव्हिंग ब्लॉक बसविणे, रस्ता काँक्रीटीकरण, सभागृह बांधणे, दगडी पायऱ्यांचे बांधकाम करणे, मंदिराकडे जाणारा रस्ता व उत्तर बाजूस संरक्षक भिंत बांधणे आदी कामे होणार आहेत. ही कामे लवकरच निविदा प्रक्रियेस येतील.

याशिवाय गिरजवडेसह या विभागातील शेती व पिण्याच्या प्रश्न सोडविण्याचे काम माझ्या हातून झाले. ते म्हणाले, येथील गिरजवडे प्रकल्प व्हावा, अशी बऱ्याच वर्षापासून या विभागातील नागरीकांची मागणी होती. त्यानुसार २०१४ मध्ये या प्रकल्पास ३२ कोटी रुपये मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरूवात केली. हे काम २०१९ मध्ये पूर्ण झाले. आज त्यामुळे या विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून या विभागाचे स्वप्न पूर्ण झाले आहेत.

कार्यक्रमास सरपंच सचिन देसाई, देवस्थान समिती अध्यक्ष डी. आर. मुळीक, मधुकर पाटील, अरविंद पाटील, आनंदा शेळके, शिवाजी मोंडे, पोलिस पाटील युवराज पाटील, शरद पाटील, आनंदा मोंडे-महाराज, शंकर क्षीरसागर, बाळासो माने, सुखदेव मुळीक, सोसायटी अध्यक्ष आनंदा मोंडे, सुभाष कुंभार, दिलीप मोहिते, कृष्णा नलवडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


English

“I have successfully facilitated the ₹32 crore Girjawade Minor Irrigation Project and secured ₹3 crore for the development of the Jyotirling Temple area,” stated Manasingrao Naik, Chairman of the Sangli District Central Cooperative Bank.

During his visit to Girjawade (Taluka Shirala), a new idol was installed at the Pandav School in the Jyotirling Temple premises. Mr. Naik inspected the newly installed idols and offered prayers. On this occasion, the temple trust and local villagers honored him with a felicitation ceremony.

Speaking at the event, Mr. Naik said, “Under the Regional Tourism Development Scheme, ₹3 crore has been sanctioned for the Shri Kshetra Jyotirling Temple. The funds will be used for laying paving blocks, road concreting, constructing an auditorium, building stone steps, improving the approach road to the temple, and constructing a protective wall on the northern side. The tender process for these works will commence soon.”

He further highlighted efforts to resolve local agricultural and drinking water issues, including the Girjawade project, which had been a long-standing demand of the people in this region. “In 2014, ₹32 crore was approved for this project, with work commencing the same year and completing in 2019. The project has brought significant relief to the residents, fulfilling a long-cherished dream of the region,” he added.

Dignitaries Present:
Village Sarpanch Sachin Desai, Temple Trust Chairman D. R. Mulik, Madhukar Patil, Arvind Patil, Ananda Shelke, Shivaji Monde, Police Patil Yuvraj Patil, Sharad Patil, Ananda Monde Maharaj, Shankar Kshirsagar, Balaso Mane, Sukhdev Mulik, Society Chairman Ananda Monde, Subhash Kumbhar, Dilip Mohite, Krishna Nalwade, among others.

Share This
Read Also: