विश्वास साखर कारखान्याची गाळप क्षमता दोन वर्षांत 10,000 टन करण्याचे उद्दिष्ट – Vishwaas Sugar Factory to Increase Crushing Capacity to 10,000 Tons Per Day in Two Years

विश्वास साखर कारखान्याची गाळप क्षमता दोन वर्षांत 10,000 टन करण्याचे उद्दिष्ट – Vishwaas Sugar Factory to Increase Crushing Capacity to 10,000 Tons Per Day in Two Years
Disclaimer

News By : Santoshkumar Bhalekar (Mobile: 7875757575), Public Relations Officer, 'Vishwas' Factory. Reporter Daily Punyanagari

शिराळा (प्रतिनिधी) : येत्या दोन वर्षात ‘विश्वास’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने आधुनिकीकरण हाती घेतले आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.


चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या सन 2024-25 गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते म्हणाले, उसाची उपलब्धता पाहता आता साखर कारखानदारीचे हंगाम 100 ते 120 दिवसापर्यंत चालतील असेल चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कमी कालावधित जास्तीचे गाळप करणे, हा एकमेव पर्याय कारखानदारापुढे राहील. त्याचा विचार करून यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. पुढील वर्षे प्रतिदिनी एकूण साडेसात हजार टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी पाच ते साडेपाच हजार टनाच्या गाळपातून साखर निर्मिती तर, 2 हजार टनाच्या गाळपातून इथेनॉल किंवा ई.एन.ए. निर्मिती होईल. त्यासाठी आसवनी प्रकल्पाचा बॉयलर व टर्बाइन वेगळे राहील.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात बोलताना अध्यक्ष मानसिंगराव नाईक. शेजारी संचालक व अधिकारी.


अध्यक्ष मानसिंगभाऊ म्हणाले, आगामी दोन वर्षात गाळप क्षमता 10 हजार टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. सह विजनिमिर्ती प्रकल्पाची क्षमता वाढ करून 22 मेगावॉट निर्मिती होत आहे. आसवनी प्रकल्प क्षमता प्रतिदिनी 1 लाख 5 हजार लीटरवर नेली आहे. ती भविष्यात 1 लाख 80 हजारापर्यंत नेण्याचा मानस आहे. कारखान्याच्या प्रगतीत ऊस उत्पादक, सभासद, तोडणी व मजूर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पुढील काळातही ते कायम ठेवावे.


प्रारंभी संचालक विराज नाईक यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. सौ. जोती व संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते साखर पोती पूजन व महापूजा संपन्न झाली. शेती समितीचे अध्यक्ष संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर तोडणी, वाहतूकदार, ठेकेदार यांचा सत्कार अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुरेश चव्हाण, विश्वास कदम, संभाजी पाटील, विष्णू पाटील, बाबासो पाटील, बिरूदेव आमरे, सुहास घोडे-पाटील, यशवंत दळवी, यशवंत निकम, कोंडिबा चौगुले, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, मुख्य मिश्रक ए. एस. पाटील तसेच इतर खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले.


Shirala (Correspondent): Vishwaas Sugar Factory aims to increase its daily crushing capacity to 10,000 tons within the next two years, with modernization efforts already underway, said Chairman Manasingrao Naik.

He was speaking at the concluding ceremony of the 2024-25 crushing season of Vishwaasrao Naik Sugar Factory in Chikhali (Tal. Shirala).

He stated that, given the availability of sugarcane, the crushing season for sugar factories is expected to last between 100 to 120 days. Therefore, the only viable option for factory owners is to maximize crushing in a shorter period. Considering this, the modernization of machinery has been initiated. The target for the next season is to crush 7,500 tons per day, with 5,000 to 5,500 tons allocated for sugar production and 2,000 tons for ethanol or Extra Neutral Alcohol (ENA) production. A separate boiler and turbine will be used for the distillery project.

Chairman Manasingbhau further stated that in the next two years, the factory’s crushing capacity will be increased to 10,000 tons per day. To achieve this, necessary upgrades in machinery are in progress. The co-generation power project’s capacity is being increased to generate 22 megawatts of electricity. The distillery project’s capacity has been expanded to 1,05,000 liters per day, with plans to further increase it to 1,80,000 liters per day. He acknowledged the significant contribution of sugarcane growers, shareholders, harvesting and transport laborers, officers, and employees to the factory’s progress and urged continued support in the coming years.

The event commenced with Viraj Naik, Director, performing the traditional crushing ceremony. Mrs. Jyoti and Director Dattatraya Patil conducted the sugar sack and Maha Puja rituals. Shivaji Patil, Chairman of the Agriculture Committee, welcomed the attendees and delivered the opening remarks.

Following this, sugarcane cutters, transporters, and contractors were felicitated by Chairman Manasingrao Naik. Among those present at the ceremony were Suresh Chavan, Vishwas Kadam, Sambhaji Patil, Vishnu Patil, Babaso Patil, Birudev Amre, Suhas Ghode-Patil, Yashwant Dalvi, Yashwant Nikam, Kondiba Chougule, Tukaram Patil, Ananda Patil, as well as Executive Director Amol Patil, Factory Manager Deepak Patil, Secretary Sachin Patil, Chief Mixer A.S. Patil, and other department heads, officials, employees, and shareholders.

The vote of thanks was delivered by Director Vishwas Patil.

Share This
Read Also: