Shirala’s Actor Sagar Rasal Shines in Chhaava – छावामध्ये झळकला शिराळ्याचा कलाकार सागर रसाळ

Marathi

सध्या सर्वदूर चर्चेत असलेल्या ‘‘छावा’’ चित्रपटाने देशभर व देशाबाहेर चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य व स्वराज्याप्रति असलेले प्रेमाला पुन्हा एकदा प्रकर्षाने उजाळा मिळाला आहे. या चित्रपटातील विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिकेतील कामाला विशेष पसंती मिळाली आहे. त्याच बरोबर या चित्रपटात सह कलाकार म्हणून शिराळ्याचा सागर रसाळ चमकला आहे.

छावा चित्रपटातील भूमिका साकारताना


सागर वसंत रसाळ सामान्य कुटुंबातील युवक. उपाहारगृह व्यवस्थापन (हॉटेल मॅनेजमेंट) शिक्षण घेऊन गोवा राज्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीस आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सागरने नोकरीबरोबर अभिनय जोपासला. कोल्हापुरात एका खासगी संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरचित्रवाणीवरील मराठी मालिकेतील कामाबरोबर लघु चित्रपटातील काम केले. विश्वासघात, चिताड, स्वच्छता अभियान, फेंडशिप, लव्हशिप, टमरेल आदी लघुचित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

छावा चित्रपटातील भूमिका साकारताना


अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी तो जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडपडत आहे. आजवर त्याने अभिनय क्षेत्रात चांगलाच प्रवास केला आहे. मराठी चित्रपट 7, हिंदी, दाक्षिणात्य व हॉलीवूड प्रत्येकी एक, मराठी मालिका 8, लघु चित्रपट 7, हिंदी मालिका 1 अशा भूमिका साकारल्या आहेत. यातून त्याच्याजवळील अभिनयाची धडपड लक्षात येते.


मालिकांतील भूमिका : ‘जीव तुझ्यात गुंतला’ ‘शेतकरी नवरा’, ‘आभाळाची माया’ मालिकेत न्यायाधीशाची भूमिका, ‘सुंदरी’ मालिकेत ‘पोलिस उपनिरीक्षक’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘गजानन महाराज’ मालिकेत सावकाराची भूमिका, ‘आभाळाची माया भाग-2’ मध्ये डॉक्टर, ‘मिट्टी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत भूमिका त्याने साकारल्या आहेत.


मराठी चित्रपटातील साकारलेल्या भूमिका :
‘ग्रीन कॉरिडोरकॉरिडॉकॉरिडॉर या मराठी चित्रपट बॉडीगार्ड, ‘रेश्मा तुझ्यासाठी काय पण’ या चित्रपटात वाहतूक निरीक्षक ऑफिसर, ‘प्रेमाची मैत्री’ या मराठी चित्रपटात मित्राची, ‘क्राईमक्राईक्राईक्राईम मालिकेत पोलीस अधिकारी, ‘खशाबाखाशाबखाशाबखाशाबा या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात सावकाराची भूमिका, दाक्षिणात्य ‘वांगडू’ या चित्रपटात दुकानदाराची भूमिका, ‘आशिया एक्सप्रेस’ या ‘हॉलीवुडहॉलीवूहॉलीवूहॉलीवूड चित्रपटात खेळाडूची भूमिका व सध्या बहुचर्चित असलेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपट मध्ये गुप्त सैनिक भूमिकेत सागर रसाळ झळकला आहे.

दिग्दर्शक, निर्माते व कलाकार नागराज मंजुळे यांच्यासोबत.

English

The much-discussed film Chhaava is receiving a tremendous response in India and abroad. It has once again highlighted the bravery of Chhatrapati Sambhaji Maharaj and his unwavering love for Swarajya. While Vicky Kaushal’s portrayal of Sambhaji Maharaj has been widely appreciated, a notable performance in the film comes from Shirala’s own actor, Sagar Rasal.

Sagar Vasant Rasal comes from a humble background. Despite studying Hotel Management and working in a five-star hotel in Goa, his passion for acting never faded. He pursued acting training at a private institute in Kolhapur while continuing his job. Over time, he has worked in Marathi television serials and short films, including Vishwasghat, Chitad, Swachhata Abhiyan, Friendship, Lovership, and Tamarel.

His determination and perseverance have helped him carve a niche in the acting industry. So far, Sagar Rasal has appeared in 7 Marathi films, 1 Hindi film, 1 South Indian film, 1 Hollywood film, 8 Marathi serials, 7 short films, and 1 Hindi TV serial, showcasing his relentless efforts in the field of acting.

Notable TV Serial Roles:

  • Jeev Tujhyat Guntla
  • Shetkari Navra
  • Abhalachi Maya (as a judge)
  • Sundari (as a police sub-inspector)
  • Tujhyat Jeev Rangla
  • Gajanan Maharaj (as a moneylender)
  • Abhalachi Maya Part-2 (as a doctor)
  • Mitti Se Bandhi Dor (Hindi TV serial)

Notable Film Roles:

  • Green Corridor (as a bodyguard)
  • Reshma Tujhyasathi Kay Pan (as a traffic officer)
  • Premachi Maitri (as a friend)
  • Crime (as a police officer)
  • Khshaba (directed by Nagraj Manjule, as a moneylender)
  • Wangdu (South Indian film, as a shopkeeper)
  • Asia Express (Hollywood film, as an athlete)
  • Chhaava (Hindi film, as a secret soldier)

Sagar Rasal’s journey from a small town to the big screen reflects his relentless pursuit of his passion. His growing presence in the industry highlights his dedication and acting prowess.

By Rohit More

Rohit More is a passionate blogger who writes about the people, culture, and progress of Sangli district.