Breaking
9 Mar 2026, Mon

महाराष्ट्र राज्य वधू-वर सूचक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन इस्लामपूर येथे उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य वधू-वर सूचक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन इस्लामपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले वधू-वर सूचक, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी इस्लामपूरचे नगराध्यक्ष मलगुंडे दादा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव आप्पा पवार, उपाध्यक्ष आणि भाग्योदय वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक श्री. जयवंत विनायक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये सध्या समाजात लग्न जुळविण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी, उशिरा होणारी लग्ने, बदललेली सामाजिक परिस्थिती या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वधू-वर सूचकांनी समाजात कुटुंबांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी कशा प्रकारे मदत करावी याबाबतही चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन दिशा वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष कुंभार सर यांनी केले. त्यांना विभाग प्रमुख अधिक पाटील यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे “आदर्श वधू-वर सूचक” पुरस्काराचे वितरण होय. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भाग्योदय वधू-वर सूचक केंद्राचे संचालक तसेच ज्योतिष पंडित श्री. सोमनाथ पाटील यांना प्रदान करण्यात आला. वधू-वर सूचक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान त्यांना देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजात विवाह संस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

By Rohit More

Rohit More is a passionate blogger who writes about the people, culture, and progress of Sangli district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *