News By : Santoshkumar Bhalekar (Mobile: 7875757575), Public Relations Officer, 'Vishwas' Factory. Reporter Daily Punyanagari
चिखली / वार्ताहर
शिराळा व परिसराला काल (ता. 25) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. तडवळे (ता. शिराळा) येथील भांगलणीचे काम करणाऱ्या महिलेचा वीज पडून शेतात जागीच मृत्यू झाला. श्रीमती सुनंदा पांडुरंग पाटील (वय ५०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

काल (ता. २५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. शिराळ्यासह चिखली, नाटोली, सागाव, भाटशिरगाव, बिऊर, उपवळे, तडवळे आदी गावात पावसाने झोडपले. यामध्ये वारा वेगाने वाहत होता. विजांचा कडकडटासह गारा पडत होत्या. त्यामुळे बिऊर हद्दीत नाथफाटा जवळ झाड उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. बिऊर ते चिखली दरम्यान बारीक सारीक झाडेही पडली होती.

तडवळे येथील श्रीमती सुनंदा पांडुरंग पाटील या आणखी काही महिलांसह रोजंदारीवर भांगलणीचे काम करण्यासाठी नदीकाठी असलेल्या शेतात गेल्या होत्या. जोराचा पाऊस, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट पाहून सर्व महिला लगबगीने गावाकडे निघाल्या. सुनंदा पाटील यांचे चप्पल शेतातच राहिल्यामुळे त्या मागे गेल्या तेवढ्यात विजेचा कडकडाट होऊन वीज त्यांच्या अंगावर पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीमती सुनंदा यांचे पती पांडुरंग पाटील यांचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यांना सचिन हा एक मुलगा असून तो मुंबई येथे खाजगी नोकरी करतो. गावात रोजंदारीवर कामे करून सुनंदा पाटील आपली उपजीविका करत होत्या. आज काळाने त्यांच्यावर असा घाला घातला, त्यामुळे मोठी हळहळ व्यक्त होत होती.
याबाबत पुतण्या सुरज पाटील व पोलिस पाटील वैशाली पाटील यांनी शिराळा पोलिसांत घटनेची माहिती दिली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल अतिग्रे, तलाठी सुनील जावीर, ग्रामसेवक प्रभावती भोसले, सरपंच प्रियांका पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अविनाश पाटील यांनी शवविच्छेदन केले.
Chikhali / Correspondent
A severe storm hit Shirala and surrounding areas on the evening of the 25th, bringing heavy rain, strong winds, and hailstorms. Tragically, a woman working in a field in Tadwale (Tal. Shirala) was struck by lightning and died on the spot. The deceased has been identified as Sunanda Pandurang Patil (50).
The storm began around 4:30 PM, affecting villages like Chikhali, Natoili, Sagav, Bhatshirgaon, Biur, Upwale, and Tadwale. The strong winds uprooted trees, and lightning accompanied by hailstones caused power lines to break, leading to power outages in the Biur-Nathphata area.
Sunanda Patil, who worked as a daily laborer, was in a field near the river along with other women for weeding work. As the storm intensified, the women rushed toward the village for shelter. Sunanda returned to retrieve her footwear left in the field when lightning struck, killing her instantly.
Her husband, Pandurang Patil, had passed away earlier, and she is survived by her son Sachin, who works in Mumbai. Sunanda earned a living through daily wage labor. Her sudden death has left the village in shock.
Her nephew Suraj Patil and Police Patil Vaishali Patil informed Shirala Police about the incident. Assistant Police Inspector Rahul Atigre, Talathi Sunil Javir, Gramsevak Prabhavati Bhosale, and Sarpanch Priyanka Patil visited the site and conducted a panchanama. Dr. Avinash Patil at Shirala Sub-District Hospital performed the post-mortem.