वाचनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आज जिल्हा परिषद मराठी शाळा बचाव मोहिमेअंतर्गत शाळेच्या पायरीचे पुण्यपूजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जिल्हा परिषद शाळांचे संवर्धन आणि संरक्षण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्रातील सुमारे 600 प्राथमिक शाळा पटसंख्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्राथमिक शिक्षणातून अनेक विद्यार्थी पुढे जाऊन यशस्वी आणि समाजोपयोगी ठरतात. त्यामुळे एकही प्राथमिक शाळा बंद होऊ नये, उलट शासनाने पटसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, हा संस्थेचा आवाज आहे.

या महत्त्वपूर्ण मोहिमेची सुरुवात वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जि.प. मराठी शाळांच्या परिसरातून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विकास पाटील, अजित जाधव, शिक्षक हसबनीस सर आणि वाचनहिताय संस्थेचे अध्यक्ष राहुल वेदपाठक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

The Power of Our District PR Ecosystem
We are not just a media agency—we are building an entire district-level digital infrastructure with:
मराठी शाळा बचाव

