2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक: शिराळ्यात स्थानिक फिटमेंट सेंटरची मागणी – Mandatory HSRP for Pre-2019 Vehicles: Demand for Local Fitment Centers in Shirala

Marathi

2019 पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (नंबर प्लेट) बसविणे बंधनकारक आहे. त्यासाठी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत शासनाने दिली आहे. वाहनांची संख्या विचारात घेता ‘नंबर प्लेट’ बसविण्यासाठीच्या केंद्रांची (फिटमेंट सेंटर) संख्या मर्यादित आहे. शिराळा तालुक्यातील वाहन धारकांना ‘नंबर प्लेट’ बदलण्यासाठी कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली ही फिटमेंट सेंटर पर्यंत ससेहोलपट होत असून आर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे. वाहनधारकांच्या सोईसाठी तालुक्याच्या ठिकाणी सेंटर सुरू करावीत, अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.

प्लास्टिक कवर बसविलेली दोनचाकीची प्लेट


1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना अतिसुरक्षित नोंदणी क्रमांक फलक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवणे बंधनकारक केले आहे. दिलेल्या संकेत स्थळावर संगणकावरून नोंदणी करताना नंबर प्लेट बसविण्याचे जवळचे ठिकाण पाहून तारीख व वेळ निश्चित करावी लागते. शिराळा तालुक्यातून नोंदणी करताना सांगली, कोल्हापूर व कऱ्हाड येथील फिटमेंट सेंटरचे पत्ते दिसतात. तालुक्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता वारणा नदीकाठावरील गावांना कोल्हापूर जवळ आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिराळा शहरासह परिसरातील गावासह उत्तर व पश्चिमेकडील भागासाठी कऱ्हाड जवळ आहे. अशी परिस्थिती आहे.

प्लास्टिक कवर नसलेली चार चाकीची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट.


एच.एस.आर.पी. साठी मुळात राज्यातील व इतर राज्यांतील दर पाहता महाराष्ट्रातील वाहन धारकांची लूट सुरू आहे. दोन चाकी व तीन चाकी वाहनास सर्व करांसहित 518 रुपये 96 पैसे इतकी किंमत मोजावी लागत आहे. चार चाकी व त्यावरील वाहनांसाठी 789.10 पैसे मोजावे लागत आहे. याशिवाय नंबर प्लेट बसविण्यासाठी पेट्रोल, डिझेलसह आनुषंगिक होणारा खर्च सोसावा लागत आहे. नंबर प्लेट बदलण्यासाठी येणाऱ्या खर्च महाराष्ट्रातच सर्वाधिक का ? यावरून वाहन धारकांतून संताप व्यक्त आहे.


लूट इथपर्यंत थांबते, असे नाही. संकेत स्थळावर नोंदणी करून घेतलेल्या वेळ, तारखेस फिटमेंट सेंटरवर गेल्यानंतर तेथे नंबर प्लेट बसवताना नंबर प्लेट मागील प्लास्टिक कवर घालण्याची भुरळ घातली जात आहे. वाहन धारकांनी हे कवर घालावे म्हणून त्यांना ते कसे चांगले आहे, हे सांगण्याचा उद्योग फिटमेंट सेंटरवर सुरू आहे. अल्प किमतीत मिळणारे हे प्लॅस्टिकचे कवर आहे. नवीन गाडी घेतल्यावर समंधीत कंपनी स्वतःची जाहिरात करून मोफत देत असते. मात्र याच कव्हरला चारचाकीला बसविण्यासाठी 500 रुपये, दोन चाकी व तीनचाकीला बसविण्यातील 200 ते 300 रुपये पर्यंत घेतले जात आहे. वरून ते ऐच्छिक आहे, असा सल्लाही दिला जात आहे.


होणारी लूट थांबून, शासनाने दर निश्चितीबाबत फेरविचार करावा व वाहन धारकांच्या सोईनुसार तालुक्याच्या ठिकाणी फिटमेंट सेंटर सुरू करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. नंबर प्लेट बदलणे मुदतीत पूर्ण न झाल्यास पुन्हा जुन्या वाहनधारकांना वाहतूक निरीक्षक, वाहतूक पोलिसांचा ससेमिरा दिसतो आहे. पकडले गेल्यास दंडाची अथवा सेटलमेंटच्या रक्कमेचा भुरदंड वेगळाच.


English

All vehicles registered before April 1, 2019, must install High-Security Registration Plates (HSRP) by March 31, 2025. The limited number of fitment centers has led vehicle owners from Shirala taluka to travel to Karad, Kolhapur, or Sangli, causing financial and logistical inconvenience. There is a growing demand for local fitment centers in Shirala to ease this process.

To install HSRP, vehicle owners must register online and select an available date and time at the nearest fitment center. However, for Shirala taluka residents, options are limited to Sangli, Kolhapur, and Karad. The geographical layout means villages along the Warna River find Kolhapur closer, while those in the north and west prefer Karad.

The pricing of HSRP plates in Maharashtra is also a concern. Two and three-wheelers are charged ₹518.96, while four-wheelers and above must pay ₹789.10, significantly higher than in other states. Additionally, vehicle owners must bear fuel and incidental costs for traveling to fitment centers.

Another major complaint is the exploitation at fitment centers, where customers are pressured into purchasing plastic covers for number plates. These covers, which automobile companies often provide free with new vehicles, are being sold for ₹500 for four-wheelers and ₹200–₹300 for two and three-wheelers. Although claimed to be optional, vehicle owners are being misled into purchasing them.



Citizens are urging the government to reconsider HSRP pricing and establish local fitment centers in taluka headquarters. If the number plate installation deadline is not met, old vehicle owners may face heavy fines or settlements from traffic authorities.

By Rohit More

Rohit More is a passionate blogger who writes about the people, culture, and progress of Sangli district.