नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १५ किलोच्या डब्यामागे सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलांच्या किमती १५० ते २०० रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक बजेटवर बसला आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांच्या आयात शुल्कात २०-३५ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे ही भाववाढ झाली आहे.
विशेषत: नवरात्रोत्सव आणि दिवाळीमध्ये तेलाचा वापर अधिक होणार असल्यामुळे दरवाढीचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होईल. खाद्यतेलांच्या किंमती वाढल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली असून, सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, आणि याचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होईल.
--
Comments